Take a fresh look at your lifestyle.

बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी संगणक गतीने बदलावे – शारदा वानखेडे

कै.परमेश्वर उत्तमराव तेजनकर पाटील बहुउद्देशीय संस्थेचा नाविन्यपूर्व उपक्रम.

0

उध्दव नागरे
लोणार तालुका प्रतिनिधी

सुलतानपूर –
समाज कार्यामध्ये सदैव अग्रेसर असणारी कै.परमेश्वर उत्तमराव तेजनकर पाटील बहुउद्देशीय संस्थेतर्फे12 फेब्रुवारी रोजी श्रि संत गजानन महाराज प्रगट दिनाच्या शुभ मुहूर्तावर संस्थेचे सचिव तथा पत्रकार सतीश पाटील तेजनकर यांचा इयत्ता चौथी मध्ये शिकणारा मुलगा चि.अभिनव सतिष तेजनकर पाटील याच्या वाढदिवसानिमित्त सहकार विद्या मंदिर सुलतानपूर येथे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पिंपरकर मॅडम यांच्या परवानगीने बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान प्राप्त होण्यासाठी व ऑनलाईन शिक्षणासाठी चि.अभिनवला संस्थेद्वारे एक नवा संगणक भेट देण्यात आला.तसेच अभिनव च्या हस्ते शाळेतील इयत्ता चौथी,पाचवी व आठवी या तीन वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शालेय उपयोगासाठी वही,पेन,पेन्सिल,खोडरबर,शॉपनर,बिस्किट व चॉकलेट च्या पॅक केलेल्या किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी कै.परमेश्वर उत्तमराव तेजनकर पाटील बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा शारदा वानखेडे,उपाध्यक्ष शोभा परमेश्वर तेजनकर, सचिव तथा पत्रकार सतीश पाटील तेजनकर,स्व.मंगलबाई ज्ञानेश्र्वर वाघ पाटिल बहुउद्देशिय शिक्षण संस्था शिवनीपीसा चे सचिव तथा पत्रकार सुनिल पाटिल वाघ, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पिंपरकर मॅडम,उपमुख्याध्यापक संतोष वायाळ सर, ढेंग सर, पडघान सर,आदि शिक्षकांसह,अविनाश भागिले, मयूर सरकटे हजर होते.सुनील पाटील वाघ,सतीश पाटील तेजनकर,शारदा वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तर शाळेत कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिल्यामुळे व कार्यक्रमास हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढविल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका व इत्यादी शिक्षकांचे आभार व्यक्त केले.तसेच अभिनवला वाढदिवसाच्या व सर्व विद्यार्थ्यांना समोरील शैक्षणिक आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.