शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके
शेगांव :
नविन शैक्षणिक सत्र २७ जून २०२२ पासून सुरू होत असुन जिल्हयातील नियमितपणे ऑफलाइन शाळा सुरु होणार आहेत,त्यामुळे इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शालेय पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.शिक्षण विभागाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी श्रध्दा वायदंडे व प्रभारी गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तक वितरणाचे प्रमुख विक्रम फुसे व त्यांचे सहकारी विषय शिक्षक विनोद वैतकार,योगेश गणोरकार,राहूल ससाने,श्रीकांत सोनोने,जयेश गायकवाड,ज्ञानेश्वर घुले,अमोल पिंगळे,रमेश वानखडे,संगीता लोखंडे यांच्या सहकार्याने केंद्रीय शाळेवर,रस्त्यालगतच्या शाळेवर पाठ्यपुस्तके तात्काळ पोहच करण्याचे नियोजन पुर्ण झालेले असुन शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यानां पाठ्यपुस्तके वाटप करण्याच्या सुचना मुख्याध्यापकांना देण्यात आलेल्या आहेत असे प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
पाठ्यपुस्तके वितरित करतांना गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात व उपस्थित मुख्याध्यापक