Take a fresh look at your lifestyle.

सुनिल गवते,यु.डी.राजपुत्र व भ.श्री.पवार यांचा इतर संघटनेतून प्रहार शिक्षक संघटनेमध्ये जाहीर प्रवेश

जिल्हाध्यक्ष यांच्या तनमनधनाच्या व वेळेच्या त्यागामुळे प्रहार शिक्षक संघटनेची अल्पकालावधीतच गरूडझेप

0

बुलडाणा : 
प्रहार शिक्षक संघटनेची संपुर्ण जिल्हयामध्ये एक वर्षाचा कालावधी पुर्ण होत नाही होत तोच इतर शिक्षक संघटनांचे अनेक पदाधिकारी जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या प्रशासकीय कामकाजाची कार्यपद्धती व जिल्हयाभरातील शिक्षकांच्या धडाडीने व तात्काळ समस्या सोडविण्याचा लावलेला सपाटा, शिक्षकांच्या समस्या निवारण वेळीच करणे,प्रशासनाच्या शासन निर्णयाची अद्यावत माहीती देणे,आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात माहिती उपलब्ध करून देणे, दरमहा वेतनाची अचुक माहिती देणे,विद्यार्थी हिताच्या अनेक समस्या सोडविणे,जिल्हयाभरातील अनेक तालुकात शाखा गठीत करणे,तालुका पदाधिकाऱ्यांचे बळ वाढविणे,शिक्षकांमध्ये प्रशासकीय संरक्षणात्मक आत्मबळ वाढविणे इत्यादी अनेक कारणामुळे इतर संघटनेतल्या अनेक दिग्गज पदाधिका-यांनी जिल्हा सरचिटणीस देवीदास बडगे, परिहार, साळुंके, सिद्धार्थ अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रहार शिक्षक संघटनेत जाहीर प्रवेश केला आहे आणि अनेक शिक्षक प्रहार शिक्षक संघटनेत जाहीर प्रवेश करण्यास उत्सुक आहेत.

संघटनात्मक कार्यकुशल, दिग्गज व निष्णात असलेले इतर संघटनेचे पदाधिकारी सुनिल गवते यांनी नुकताच प्रहार शिक्षक संघटनेमध्ये प्रवेश केल्यामुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.त्याचबरोबर जिल्हयातील निष्ठावान व संघटनात्मक कौशल्ये प्राप्त असलेले यु.डी.राजपुत,भ.श्री.पवार व सुरेंद्र जाधव यांनी प्रहार शिक्षक संघटनेत जाहीर प्रवेश केल्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेला आणखीणच प्रबळ व संघटनात्मक वाढी करिता मजबूत बळ प्राप्त झालेले आहे.

दिग्गज पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश कार्यक्रमामध्ये सन्मान करतांना जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे व उपस्थित मान्यवर

प्रहार शिक्षक संघटनेच्या वाढीकरिता व संघटन मजबुत करण्यासाठी सुनिल गवते यांची प्रहार शिक्षक संघटनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख या पदावर प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे व जिल्हा सरचिटणिस देविदास बडगे यांनी नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला आहे तसेच यु.डी.राजपुत व भ.श्री.पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.

सदर पदाधिका-यांच्या प्रवेशामुळे संपुर्ण जिल्हयातील शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे असे प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.