Take a fresh look at your lifestyle.

सिरसपूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम

शंकरपूर

0

शंकरपूर

चमत्कार करण्याचे सामर्थ्य फक्त निसर्ग आणि विज्ञानामध्ये आहे हे सामर्थ्य कोणत्याही बुवाबाजी बाबा महाराज यांच्यात नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या चमत्कारावर विश्वास न ठेवता त्या चमत्काराचा विज्ञान दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याचा भांडाफोड करावा तसेच तंत्र मंत्र जादू टोना हे अस्तित्वात नाही या मंत्रांनी भाजला पापड मोडू शकत नाही.

त्यामुळे जनतेने या मंत्रावर विश्वास न ठेवता व कोणत्याही बुवाबाजीच्या मागे न लागता आपलं जीवन जगावं असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्त् आमोद गौरकर यांनी सिरसपूर येथे केले आहे शंकरपुर पासून जवळच असलेल्या सीरसपूर येथे शंकरपूर पोलीस चौकीचे सहाय्यक निरीक्षक विनोद जांभळे यांच्या वतीने आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन या कार्यक्रमात बोलत होते.

याच कार्यक्रमात चिमूर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका संघटक सारंग भिमटे व जिल्हा कार्यकारणी सदस्य पंकज मिश्रा यांनी प्रात्यक्षिक दाखवून समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांनी जादूटोणा कायद्या संदर्भात मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला जमादार सतिश रायपुरे भोयर अमित उरकुडे सुभाष चांदनखेडे उपस्थित होते प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोतराजे कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पोलीस पाटील वैशाली वाघ यांनी केले आहे

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.