BJP : अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार? प्रवेशावर काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आता भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा रंगलीय. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे (Congress) काही आमदार सुद्धा भाजपच्या गळाला लागले आहेत.