Take a fresh look at your lifestyle.

बालकाचे लैंगिक शोषण प्रतिबंध जनजागृतीसाठी शिक्षकांचे सक्षमीकरण प्रशिक्षण

अर्पण सेवाभावी संस्थेचा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम

0

शेगांव :
बालकाचे हक्क व अधिकार अंतर्गत बालकाचे लैंगिक शोषण थांबविण्यासाठी श्रध्दा जाधव यांनी प्रशिक्षणामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना विद्यार्थी व पालक यांना समदेशन करण्याच्या अंमलबजावणी उद्बोधन केले.
दि.२१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी पर्यत अर्पण सेवाभावी संस्था मुंबई व जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय प्रशिक्षणामध्ये तालुक्यातील कार्यरत असलेल्या २८६ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
बालकांचे लैंगिक शोषण या संदर्भात बालकांना व पालकांना समुपदेशन करणे व यासंदर्भात सविस्तर माहिती देऊन जनजागृती करणे व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांचे सक्षमीकरण करणे हा प्रशिक्षणाचा उदात्त हेतू आहे.
सदर प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखाली यशस्वीरित्या सुरू असुन सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी विषय तज्ञ रमेश वानखडे व गटसमुह केंद्राचे सर्व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.
सदर प्रशिक्षणाकरिता सर्व शिक्षा अभियान अंतर्गत असलेल्या विषय शिक्षिका संगीता लोखंडे व तालुक्यातील महिला शिक्षिका व शिक्षक उपस्थित होते.

प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन व उद्धबोधन करतांना अर्पण सेवाभावी संस्थेच्या मार्गदर्शिका श्रध्दा जाधव

Leave A Reply

Your email address will not be published.