जिल्हास्तरिय क्रिडा स्पर्धेमध्ये शिक्षिका सुषमा खेडकर यांची बाजी
धावणे,बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजेतेपद तर गोळाफेक स्पर्धेत उपविजेतेपद
शेगांव :
जिल्हा परिषद अधिकारी,कर्मचारी यांच्या जिल्हास्तरिय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम दि.२७ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहेत,सदर क्रिडास्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक स्पर्धेअंतर्गत क्रिकेट,फुटबॉल,व्हॉलीबॉल,कबड्डी,खो-खो,टेनिक्वाइंट,बॅडमिंटन,धावणे,भालाफेक,गोळाफेक, थाळीफेक,लांब उडी,उंच उडी,कॅरम, बुध्दीबळ,टेबल टेनिस आदि खेळासह सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत लोकगीत गायन,सिनेगीत,करावके गीत,समुह नृत्य,एकल नृत्य याचा समावेश करण्यात आलेला आहे.
सदर जिल्हास्तरिय क्रिडा स्पर्धेमध्ये पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जि.प.शाळा जलंब ( मुले ) येथे कार्यरत असलेल्या शिक्षका सुषमा खेडकर यांनी १०० मिटर धावणे स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून विजेतेपद, गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून उपविजेतेपद तर बॅडमिंटन (महिला एकेरी) क्रिडा स्पर्धेमध्ये मोताळा संघ विरूध्द शेगांव संघामध्ये चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये मोताळा संघाला पराभूत करून बॅडमिंटन (महिला एकेरी) क्रिडा स्पर्धेमध्ये विजेतेपद प्राप्त केले असुन बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेच्या उपान्त्य फेरीमध्ये सुषमा खेडकर यांनी प्रवेश केलेला आहे.
जिल्हास्तरिय क्रिडा स्पर्धेमध्ये महिला कर्मचा-यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन उत्तुंग भरारी घेतली आहे. या क्रिडा स्पर्धेतील घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
धावणे या क्रिडा स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धकांचा पिछेहाट करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकांच्या मानकरी ठरलेल्या शिक्षिका सुषमा खेडकर