Take a fresh look at your lifestyle.

शिक्षिका सुषमा खेडकर यांनी विभागीय स्तरावर प्राप्त केले बॅडमिंटन क्रिडा स्पर्धेमध्ये विजेतेपद

0

शेगांव : 
पंचायत समिती शेगांव अंतर्गत माटरगाव केंद्रातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जलंब ( मुले ) येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सुषमा खेडकर यांनी बुलडाणा विरूध्द यवतमाळ संघामध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या बॅडमिंटन ( महिला एकेरी ) क्रिडा स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करत विभागीयस्तरावर बुलडाणा संघाच्या सुषमा खेडकर यांनी अंतीम सामन्यामध्ये विजेतेपद प्राप्त केले आहे.
जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा दि.१० फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीमध्ये नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या अमरावती,यवतमाळ,वाशिम,अकोला व बुलडाणा या पाच जिल्हयातील जिल्हास्तरावर विजयी झालेल्या स्पर्धकांच्या विभागस्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या,या विभागीय स्तरावरच्या पारितोषिक वितरण व समारोपीय सोहळ्यामध्ये विभागीय आयुक्त डाॅ.दिलीप पांढरपट्टे,जिल्हाधिकारी ( यवतमाळ ) अमोल येडगे,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते (बुलडाणा),डाॅ.श्रीकृष्ण पांचाळ (यवतमाळ),सौरभ कटियार (अकोला)श्रीमती वसुमना पंत (वाशिम) अविश्यांत पंडा (अमरावती),पोलिस अधिक्षक डाॅ. पवन बन्सोड (यवतमाळ),उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर,कर्मचारी क्रिडा स्पर्धेचे सचिव प्रकाश येरमे आदिची उपस्थिती होती.
सदर विजयी खेळाडूंना,विजेतेपद प्राप्त करणा-या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र,सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले आहे.

 

विभागस्तरीय बॅडमिंटन क्रिडा स्पर्धेमध्ये विजेतेपदाच्या मानकरी ठरलेल्या सुषमा खेडकर यांना सन्मानित करतांना उपस्थित मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.