एम.ए.शैक्षणिक संप्रेषण व तत्सम पदव्युत्तर पदवी अर्हताधारक शिक्षकांना पदोन्नती करिता सामावून घ्यावे.
प्रहार शिक्षक संघटनेची शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडू यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी
शेगांव :
नेट,सेट,पी.एच.डी,एम.ए.(एज्युकेशन) याप्रमाणे एम.ए. विषय संप्रेषण (शिक्षणशास्त्र) व शैक्षणिक संप्रेषण पदव्युत्तर पदवी या अर्हताधारक शिक्षकांना प्रशासकीय सेवा वर्ग-१ व २ या पदावर प्राधान्याने सामावून घेण्यात यावे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी निवेदनामार्फत केली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत महाराष्ट्र शासन मान्यता असलेली विषय संप्रेषण (शिक्षणशास्त्र) व शैक्षणिक संप्रेषण पदव्युत्तर पदवी शैक्षणिक प्रणालीतील शास्त्रीय व मुलभूत तत्त्वांचा असुन शिक्षणशास्त्र म्हणून संरचना केलेली म्हणून एम.ए ( एज्युकेशन ) प्रमाणे विषय संप्रेषण ( शिक्षणशास्त्र )व शैक्षणिक संप्रेषण तसेच तत्सम पदव्युत्तर पदवी सुद्धा शासन निर्णयामध्ये सामावून घेऊन सदर अर्हताधारक शिक्षकांचे उच्च शिक्षण असल्यामुळे पदोन्नती करिता पात्र समजण्यात यावे असे निवेदनामध्ये नमुद करण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
निवेदन देतांना प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी