कठोरा केंद्रातील शिक्षकांची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कठोरा केंद्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची शिक्षण परिषद जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा भास्तन ( जुने ) येथे सरपंच रामराव मिरगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर शिक्षण परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक अंनतराव वानखडे,सुनिल घावट, विष्णू घोगले हे लाभले होते.
सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून शिक्षण परिषदेला सुरूवात करण्यात आली,याप्रसंगी मुख्याध्यापक सुरेश अंबलकर यांनी शिक्षण परिषदेची उद्दिष्टे प्रास्ताविक भाषणांमधून सांगितली,केंद्रप्रमुख प्रमोद इंगळे यांनी निपुन भारत,स्वच्छता माॅनिटर,प्रशासकीय विषय, शिक्षण परिषदेतील विषय पत्रिकेनुसार शिक्षकांना उद्बोधन केले.

शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन अनिल केसकर तर आभारप्रदर्शन एक.एस. भराडे यांनी केले.याप्रसंगी कठोरा केंद्रातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.