Take a fresh look at your lifestyle.

कठोरा केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

0

शेगांव : 
तालुक्यातील कठोरा केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा भास्तन (नवे) येथे मुख्याध्यापक सुनिल घावट,अंनतराव वानखडे,आर.डब्ल्यू.नावकार,कार्यालयीन प्रतिनिधी रमेश वानखडे,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

केंद्रप्रमुख विनोद ठाकरे व विषय शिक्षक रमेश वानखडे यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबवायचे उपक्रम,शालेय माहिती ऑनलाईन भरणे,प्रशासकीय करायची कामे,इयत्ता पहिलीच्या वर्गाचे उपक्रम,शिष्यवृत्ती परीक्षा आदि विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक वृंद
मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक वृंद

याप्रसंगी मुख्याध्यापक व शिक्षकांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.