Take a fresh look at your lifestyle.

युद्धाचा सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम, जाणून घ्या आजचे दर

सराफ बाजारात सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ

0

Gold-Silver Price Today : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह जगभरातील सराफ बाजारात सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय सराफ बाजारात सोने-चांदीचे भाव (Gold Silver Price) आपल्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर वेगाने पोहोचत आहेत. सोन्याच्या भावामध्ये अचानक आलेल्या तेजीनंतर आज प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याचा दर 52,000 रुपयांवर पोहचला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सतत वाढ दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.45 टक्क्यांनी वधारला. दुसरीकडे, चांदीचे भाव 0.54 टक्क्यांनी वधारत आहेत. सोन्याचा वाढत्या किंमती पुन्हा एकादा नवा रेकॉर्ड सेट करतील. ऑगस्ट २०२२मध्ये MCX वर १० ग्रॅम सोनस्याचा भाव ५६२०० रुपये उच्च पातळीवर पोहचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.