प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न
धडाडीच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन सलिम पिर मोहम्मद यांचा प्रहार शिक्षक संघटनेत जाहीर प्रवेश
शेगांव : सद्यस्थितीत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वधर्मीय बांधवांनी आपली एकात्मता जपत सामाजिक समता, बंधुता अबाधित राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ही सामाजिक भावना जोपासत अकोट रोड स्थित असलेल्या मुस्लिम बांधवांच्या वसाहतीमध्ये जिल्हा कार्यकारिणी सदस्य बिस्मिल्ला कुरेशी यांच्या निवास स्थानी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये “ईद मिलन” कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी मौलाना मो. जुनैद यांनी पवित्र रमजान महिन्याविषयी सविस्तर माहिती दिली, धडाडीच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन सलिम पिर मोहम्मद यांनी प्रहार शिक्षक संघटनेत जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट,मिलिंद इंगळे,रजा खानसर,नईमसर,अन्सार शाहसर,प्रशांत नागे,विजय टापरे,अनिससर,मतिनसर,वकारसर,जमिलबाबु,जुनेदसर,मुश्ताकसर, अनिस कुरेशी,दत्तात्रय रेवस्कर, राहुल वैराळकर व उर्दु शिक्षक बांधव तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नईमसर यांनी केले.