शेगांव शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार
शेगांव :
करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेला असुन त्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेगाने सुरुवात झालेली आहे.
पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित शेगांव र.नं.९५३ चे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ६८ शिक्षकांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केलेली असुन सन २०२२ ते २०२७ या कालावधीकरिता संचालक पदासाठी होणारी निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे,पतसंस्थेच्या प्रगतीपथाचा आलेख उंचावण्यासाठी, शिक्षकांचे हित जोपासण्यासाठी व पतसंस्थेमध्ये सर्व जातीच्या प्रवर्गातील शिक्षकांना संचालक पदाची सामाजिक समतेनुसार प्रतिनिधित्व मिळण्यासाठी ६८ शिक्षकांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केलेले आहेत.
यामध्ये सर्वसाधारण ८, महिला राखीव २, अनुसूचित जाती,जमाती १, इतर मागासवर्ग १, भटक्या विमुक्त जातीजमाती व विशेष मागास प्रवर्ग १ असे एकूण १३ संचालक प्रतिनिधी निवडून द्यायचे असुन संचालक पदासाठी एकूण ६८ शिक्षकांनी नामनिर्देशन अर्ज उपनिबंधक कार्यालयामध्ये दाखल कलेले आहेत.
मतदान दि. १५ मे रोजी असुन सदर निवडणुक संपन्न झाल्यानंतर लगेच मतमोजणी करून निवडणूकीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे.