Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्थापनेपासून चिंचखेड गावात झाले बसचे प्रथमतः आगमन

चिंचखेड गावात झाले बसचे प्रथमतः आगमन

0

शेगांव :
महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय.एसटीची सेवा “गाव तेथे एसटी”, “रस्ता तेथे एसटी” या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत प्रवाश्यांच्या सेवेसाठी विस्तारलेली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्च परिवहन महामंडळाच्या स्थापनेपासून शेगांव पासुन साधारणत: पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचखेड गावामध्ये प्रथमतः बसचे गावात आगमन झाल्यामुळे मार्गक्रमण करण्याची विद्यार्थ्यांना व गावक-यांना सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गावक-याच्या आनंदाला परावार राहिला नाही,त्यामुळे सरपंच चंद्रशेखर भाबंरे,दामोदर भाबंरे,रघुनाथ भाबंरे,परसराम भाबंरे,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद इंगळे,शिक्षक गणपत राठोड व शाळेतील विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ शेगांव आगाराचे वाहक व चालकाचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.