Take a fresh look at your lifestyle.

बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी जनजागृतीची गरज

अर्पण सेवाभावी संस्था मुंबई यांच्यामार्फत शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण

0

शेगांव : 
जवळचे नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींकडूनच बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याची सद्यःस्थिती आहे. मागील अनेक दिवसांपासून बाल लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत. बहुतांश घटनांमध्ये नातेवाईक, ओळखीच्या व्यक्तींकडूनच शोषण झाले आहे.

बालकांबाबतच्या अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी सावधगिरी बाळगणे, त्यांच्या समुपदेशनासह आता ‘ सुरक्षित स्पर्श,असुरक्षित स्पर्श ’ या विषयी मुलांमध्ये जागरूकतेची गरज असल्यामुळे अर्पण सेवाभावी संस्था मुंबई व जिल्हा परिषद यांच्यामार्फत शिक्षकांचे बाल लैंगिक शोषण प्रतिबंध व वैयक्तिक सुरक्षा संदर्भातील प्रशिक्षण दि.२१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी पर्यत २८६ शिक्षकांना श्री.संत गजानन महाराज इंग्लिश विद्यालय येथे देण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षण श्रध्दा जाधव हया बाल लैंगिक शोषण थांबविण्यासाठी पालकांना,बालकांना समुपदेशन करण्यासाठी शिक्षकांना सक्षमीकरण प्रशिक्षण देत आहेत.

सदर प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असुन हे प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी गटसाधन केंद्राचे रमेश वानखडे,योगेश गणोरकार,विनोद वैतकार,राहूल ससाने,विक्रम फुसे,श्रीकांत सोनोने आदी कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.