Take a fresh look at your lifestyle.

लोणार तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच

0

उध्दव नागरे
लोणार :-

लोणार तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण होऊन पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.

लोणार तालुक्यातील राजनी येथे श्री समाधान विठोबा अवचार यांच्या घरी लवकरच लग्न समारंभ असल्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी रात्री उशिरापर्यंत घराची साफसफाई करून स्वतःच्या अंगणामध्ये झोपले असताना काही अज्ञात चोरट्यांनी घराबाहेर झोपल्याचा फायदा घेऊन रात्री अंदाजे एक ते चार वाजे दरम्यान घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडून घरात घुसून कपाटा मधील सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम दोन्ही मिळून अंदाजे तीन लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास करून स्वतःची छन छन करून घेतली.परंतु घरमालकाला मात्र घरी लवकरच असलेल्या लग्नाच्या तोंडावर फार मोठी आर्थिक अडचण तयार केली आहे.
समाधान अवचार यांनी घडलेल्या घटनेची मेहकर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध अ.क्रं.380,457नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.