Take a fresh look at your lifestyle.

पिकलेल्या पपईपेक्षा कच्ची पपई खाण्याचे हे आहेत फायदे; लेख वाचला तर कच्ची पपई रोज घरी आणून खाल

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

अनेकवेळा लोकांना पिकलेली फळे खायला आवडतात. तर कित्येकजण बाजारातून कच्ची फळे आणून घरी पिकवून खात असतात. मात्र आज आपण आपल्या शरीराला पोषक ठरणाऱ्या बहुगुणी पपई या फळाविषयी कोणालाच माहीत नसलेली उपयुक्त अशी माहिती पाहणार आहोत.

सगळेचजण पिकलेली पपई ही खात असतात. यामुळे आपल्या शरीराला फायदा तर होतोच. मात्र कच्ची पपई खाल्ल्याने आपल्या शरीराला पिकलेल्या पपईपेक्षा किती तरी पटीने जास्त फायदा होत असतो.

आता तुम्ही म्हणाल ते कसे? तर त्यासाठी आपल्याला हा संपूर्ण लेख वाचावा लागेल.

कच्ची पपईमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए सह अँटी ऑक्सीडेन्ट,फायटोन्यूट्रिएंट्स आणि इतर पोषक घटक आढळतात. ज्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच कच्ची पपई खाल्ल्याने कर्करोगाला रोखता येते.

अनेकजण आपले वजन वाढल्याने त्रस्त असतात. मात्र कच्ची पपई खाल्ल्याने आपली फॅट जळण्यास मदत होते. परिणाम वजन कमी होते. याचसोबत कच्ची पपई ही पोटाच्या आजार, गॅस, पोटदुखी आणि पचन प्रणालीवर सुद्धा परिणाम करते.

कच्ची पपई लघवीचे संसर्ग रोखण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच कावीळ किंवा लिव्हरशी निगडित आजारावरही कच्ची पपई गुणकारी आहे.

कच्ची पपई ग्रीन टी मध्ये उकळवून प्यायल्याने संधिवात बरा होण्यास मदत मिळते. आणि संधिवात आणि सांध्यातील वेदना कमी होतात.

कच्ची पपईचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे, मधुमेहाच्या आजारात देखील कच्ची पपई खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करते आणि मधुमेह देखील नियंत्रित राहतो.

-निवास उद्धव गायकवाड

 

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.