Take a fresh look at your lifestyle.

India GDP Growth Rate : देशाचा आर्थिक विकास दर ७ टक्के; व्ही. अनंत नागेश्‍वरन

0

मुंबई : चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकास दराच्या अंदाजात घट करत तो सात टक्के राहील, असा अंदाज प्रमुख आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्‍वरन यांनी व्यक्त केला. यापूर्वी जानेवारी महिन्यात विकासदर आठ टक्के राहील, असे भाकीत वर्तवण्यात आले होते. पुढील दशकभर देशाचा आर्थिक विकास दर ७ टक्के कायम राहील. गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम विकास दरावर होईल.

आंतरराष्ट्रीय एजन्सीज देशाचा विकास सहा टक्क्यांनी होईल असे सांगतात; मात्र हा दर देशासाठी सहजसाध्य करण्याजोगा आहे. कॅपेक्स बूम आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे प्रत्येकी ०.५० टक्के वाढ होण्याचा आपला अंदाज असल्याने देशाचा विकास दर सात टक्क्यांचा आकडा पार करणे सोपे होईल. कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाचा आंतरराष्ट्रीय विकासावर परिणाम अजूनही दिसून येईल, असे मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.