Take a fresh look at your lifestyle.

स्टेशन येण्याआधी ट्रेन थांबवून कचोरी खाणं पडलं महागात, व्हायरल व्हिडीओनंतर पाच जणांवर कारवाई

पाकिस्तानमधील एका पॅसेंजर ट्रेनचा ड्रायव्हर एका विचित्र कारणामुळे चर्चेत आला होता. दही घेण्यासाठी ट्रेन मध्येच थांबवून असिस्टंट पाठवलं होतं. असाच व्हिडीओ राजस्थानमधून समोर आला आहे.

0

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने चर्चेत असतो. नेटकरी कोणता व्हिडीओ डोक्यावर घेतील सांगता येत नाही. काही व्हिडीओ हसायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. काही व्हिडीओ पाहिल्यावर वाटतं कोण काय करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील एका पॅसेंजर ट्रेनचा ड्रायव्हर एका विचित्र कारणामुळे चर्चेत आला होता. दही घेण्यासाठी ट्रेन मध्येच थांबवून असिस्टंट पाठवलं होतं. आता असाच व्हिडीओ राजस्थानमधून समोर आला आहे. राजस्थानमधील अलवरमध्ये कचोरी खाण्यासाठी ट्रेनच्या इंजिन लोको पायलटने स्टेशनच्या आधी ट्रेन थांबवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की ट्रेन थांबते आणि एक माणूस इंजिन ड्रायव्हरला कचोरीचे पॅकेट देत असल्याचे दिसत आहे. मग ट्रेन सुटते. यादरम्यान फाटक बंद असल्याने दोन्ही बाजूने लोक ट्रेन सुटण्याची वाट पाहत असतात. अलवरची कचोरी घेण्यासाठी रेल्वे इंजिन स्टेशनच्या पहिल्या गेटवर थांबल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्टेशन अधीक्षकांसह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.

जेव्हा एका व्यक्तीने लोकोमोटिव्ह ड्रायव्हरला कचोरीचे पॅकेट दिले होते, तेव्हा गेट ओलांडून जाण्यासाठी वाट पाहत असलेल्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला होता. व्यक्तीने व्हिडीओ चित्रित केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपींवर कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.