Take a fresh look at your lifestyle.

शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांचे प्रशिक्षण संपन्न

प्रशिक्षणादरम्यान गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांची आकस्मिक भेट

0

शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत कठोरा समूह
साधन केंद्रातील सर्व शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शालेय व्यवस्थापन समिती
सदस्यांचे प्रशिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सगोडा येथे दिनांक २६ मार्च रोजी संपन्न झाले.
सदर प्रशिक्षणामध्ये उपस्थिताना शालेय व्यवस्थापन समितीची रचना, कार्य, जबाबदाऱ्या
याबद्दल विशेष माहिती देण्यात आली.
त्याचप्रमाणे बालकांचे हक्क,
आर्थिक व्यवहार अंकेक्षण,समितीच्या सभेचे इतिवृत्त लेखन,
सर्व विषयाबाबत गटकार्याच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली व सदर विषयासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली.
प्रशिक्षणामुळे शालेय व्यवस्थापन समिती अधिक सक्षमपणे काम करतील अशी अपेक्षा केंद्रप्रमुख जी.डी.गवई यांनी व्यक्त केली.सुरेश डोसे व विष्णू घोगले यांनी सुलभकाचे कार्य यशस्वीपणे करून उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात यांनी आकस्मिकपणे भेट देऊन शालेय व्यवस्थापन समितीचे शैक्षणिक गुणवत्ता वाढ करणे,शाळा विकास आराखडा तयार करणे,शाळेला सर्वतोपरी सहकार्य करून लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेच्या गरजेनुसार शैक्षणिक दृकश्राव्य साधने, भौतिक सुविधा उपलब्ध करण्यास सहकार्य करणे आदी विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी केंद्र प्रमुख इंदुमती डाबेराव,विषय तज्ञ विनोद वैतकार,रमेश वानखडे,उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट, सचिन वडाळ,अर्जुन गिरी,अंनतराव वानखडे,विमोचन जाधव,दिलीप भोपसे,मीनाक्षी जुनघरे,अनिल केसकर,जीवन ढोलवाडे,गणेश अढाऊ,प्रमोद इंगळे,गणपत राठोड, राजेश बावणे,शालेय व्यवस्थापन समितीचे पी.एन.पाटील,नंदकिशोर ढेकणे,संजय काळे,उज्वला तांगडे,अरूण मिरगे,ज्ञानेश्वर मिरगे, रामकृष्ण मिरगे, योगेश मिरगे, अशोक तलवारे,विठ्ठल कवरे,मिना खोडे,मिना वानखडे, विनोद वानखडे,पुरूषोत्तम भांबेरे,अमरदिप चोपडे, सुनिल खवले,राजु इंगळे प्रकाश म्हस्के,सोनाली खवले,सुमित्रा लोणाग्रे, राजकन्या वावरे आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.
सदर प्रशिक्षणाकरिता सगोडा शाळेचे मुख्याध्यापक शामकुमार डाबेराव तसेच प्रफुल्ल भोंडे,माणिकराव देशमुख,संजय लंके,नंदकिशोर ढाकरे,अन्नपुर्णाताई तायडे यांचे मोलाचे सहकार्य केले.

शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांचे प्रशिक्षण संपन्न
शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांचे प्रशिक्षण संपन्न

प्रशिक्षणामध्ये उपस्थित गटशिक्षणाधिकारी एन.डी.खरात,मुख्याध्यापक,शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.