शेगांव :
खामगाव-शेगांव कर्मचारी सहकारी पतसंस्था र.न.१२०१ निवडणुकीमध्ये सत्ताधा-यांच्या विरोधात परिवर्तन पॅनलमध्ये लढत होत असून या निवडणूकीमध्ये परिवर्तन पॅनलचे पारडे जड दिसुन येत आहे,संचालकाच्या पंधरा पैकी पंधरा जागेवर विजयाचा दावा परिवर्तन पॅनलच्या समर्थकांनी केलेला असुन पतसंस्थेच्या हितासाठी व पारदर्शक कारभारासाठी नवीन अभ्यासू तरूण उच्चश्रेणी मुख्याध्यापक, शिक्षक,केंद्रप्रमुख यांना पॅनलमध्ये संधी दिली असून यांच्या माध्यमातून नविन संकल्पनेसह कर्मचारी हितासाठी परिवर्तन पॅनल काम करणार असल्याचे पॅनल समर्थकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पतसंस्था ही कर्मचा-यांची संस्था असून तीच्या स्थैर्यासाठी परिवर्तन पॅनल नविन संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून कारभार चोख ठेवणे,सभासदांचे हित लक्षात ठेवून पारदर्शक कारभार ठेवणे आदी कामे सत्तेत आल्यानंतर करणार असल्याचे पॅनलच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पतसंस्था निवडणूक सभेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले शिक्षक,पॅनल प्रमुख व परिवर्तन पॅनलचे उमेदवार
पतसंस्थेचा कारभार पारदर्शक, विकासाभिमुख होण्याच्या दृष्टीने सहकार पॅनल तयार करण्यात आले असून मतदार सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद परिवर्तन पॅनलला मिळत असल्याचे दिसून येत आहे.
पतसंस्थेचे कामकाज एकाधिकारशाही व मनमानी कारभारापासून अलिप्त ठेवण्यासाठी परिवर्तन पॅनल काम करणार असल्याची परिवर्तन पॅनलची भूमिका आहे.