उद्धव नागरे हे जनसामान्यांच्या मनातील युवा नेतृत्व:-सचिन प्र सानप
अंजनी खुर्द : पहिल्या पासून समाजकार्याची आवड असणारे,गरीब असून सुद्धा उच्चशिक्षित,माणूस जोपासणारे उद्धव नागरे.
अंजनी खुर्द : उद्धव नागरे हे जनसामान्यांच्या मनातील युवा नेतृत्व:-सचिन प्र सानप
नई सोच ही नए विकास का आधार है,
मेरे देश की तरक्की की रफ्तार है’
रह ना जाए हमारा क्षेत्र विकास में पीछे
इसका युवा नेतृत्व ही एक मात्र उपचार है
उद्धव नागरे महारचिकना गावातील एक गरीब घरातील व्यक्ती.पहिल्या पासून समाजकार्याची आवड असणारे,गरीब असून सुद्धा उच्चशिक्षित,माणूस जोपासणारे उद्धव नागरे.
जिल्हापरिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीचे घोडे मैदान लवकरच सुरू होणार आहे.तरी उद्धव नागरे यांची जनतेसाठी काम करण्याची निस्वार्थ इच्छा आहे.तरी ते ह्या समाजकार्याला राजकारणाची जोड देऊ इच्छितात.कित्येक जनतेचे निस्वार्थ काम करून देणारे उद्धव नागरे यांची अंजनी खुर्द पंचायत समिती सर्कल मधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.तरी आमचा सर्वांचा उद्धव नागरे यांना उघड आणि जाहीर पाठिंबा आहे.
उद्धव नागरे यांनी निवडणूक लढवण्यासाठी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाताशी घेतला तरी आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांना पाठिंबा देऊच.
कारण प्रस्थापितांचं नेतृत्व पाहिजे की हुकूमशाही नेतृत्व पाहिजे ?
आज समाजासाठी नेतृत्व करणारे अनेक आहेत. पण त्यातच प्रामाणिक आणि सचोटीने नेतृत्व करणारे फार कमी आहेत. त्याचबरोबर आता नेतृत्व करणारे लोकांच्या गरजांकडे पाठ फिरवून नेतृत्व करण्याचा देखावा करतात. नेतृत्व की हुकूमशाही? असा प्रश्न आज सर्वाना पडलाय. मग हे चित्र बदलायला आता आपण तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा हे ही खरं. प्रस्थापित नेते एखाद्या समाजाच्या समस्यांकडे पाठ फिरवतात, दुर्लक्ष करतात. मग दुर्लक्षित समाजाची दखल घ्यायला भाग पाडण्यासाठी हाच तरुण वर्ग पुढे सरसावतो आणि आपल्या समाजाचं नेतृत्व करतो. या जुन्या नेतृत्वाखाली काही साध्य होणार नसेल तर तरुणांनी नेतृत्व करणं चुकीचं आहे असं म्हणणं मूर्खपणाचं लक्षणं आहे. आज प्रस्थापित नेतृत्व असणारे लोक फक्त सत्तेसाठी आणि मोठेपणा करण्यासाठीच आपलं नेतृत्व करतायत. अशा लोकांच्या सत्तेला धक्का देण्याची ताकद तरुण नेतृत्वात आहे याला दुमत नाही. जर प्रत्येक तरुण असाच आपल्या उद्धव नागरे सारखा आपल्या समाजासाठी झटला, अथवा तसं नेतृत्व केलं तर हे नवं नेतृत्व देशाला महासत्ता बनवू शकेल यात शंका नाही.
वरील विषयाचा जर विचार केला तर उद्धव नागरे हा एकमेव माणूस आहे की,त्यांचे स्वप्न आभाळाला भिडणारे आहे.सर्व सर्व जनतेने जात,पात,धर्म,पंत न पाहता एक काम करणारे गरीब व्यक्तिमहत्व असणारे उद्धव नागरे यांच्या पाठीमागे भक्कम पणे उभे राहावे.अशी उद्धव समर्थकांची इच्छा आहे.उद्धव ला एकदा पाठिंबा देऊन बघा तुमचा “उदोउदो” झाल्या शिवाय राहणार नाही.
घराणेशाही राजकारणामुळे आपण आज रोजी सुद्धा मूलभूत सुविधा पासून दूर आहोत.कुण्या एखाद्या घराणेशाही पुढाऱ्याला पाठिंबा दिल्या पेक्षा एकदा ह्या ध्येयवेड्या माणसाला पाठिंबा देऊन पहा.कारण युवा नेतृत्व बदलत आहे राजकारणाची आणि देशाची दिशा
✍️✍️✍️✍️✍️ सचिन प्र सानप(खळेगाव)