Take a fresh look at your lifestyle.

Apple चा रशियाला मोठा झटका, अनेक उत्पादनांची विक्री केली बंद

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ॲपलने रशियामधील सर्व विक्री चॅनेलवर निर्यात थांबवली आहे.

0

Ukraine Russia War : रशिया युक्रेनमधील युद्धाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. अनेक देशांकडून रशियावर निर्बंध लादले जात आहेत. या दरम्यान दिग्गज टेक कंपनी ॲपल (Apple) ने देखील रशियामध्ये आपल्या उत्पादनांची विक्री थांबवली आहे. कंपनीकडून ही माहिती दिली आहे. यापूर्वी कंपनीने रशियामध्ये ॲपल पे (Apple Pay) च्या सेवेवर बंदी घातली होती. तसेच ॲपलने रशियाचे न्यूज ॲप्स आरटी (RT) आणि स्पुतनिक ॲप (Sputnik App) देखील त्यांच्या App स्टोअरमधून काढून टाकले आहेत.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ॲपलने रशियामधील सर्व विक्री चॅनेलवर निर्यात थांबवली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आणि बाधित देशांच्या सरकारशी चर्चा करत आहेत.

गेल्या आठवड्यात युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव्ह यांनी ॲपलला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी रशियाला कंपनीची उत्पादने, सेवा आणि ॲप स्टोअरमधून काढून टाकण्याची मागणी केली होती. ते म्हणाले की, अशा हालचालीचा तरुणांवर परिणाम होईल आणि रशियाचे लोक त्यांच्या सैन्याच्या धोरणांना विरोध करतील. ॲपलच्या निर्णयानंतर मायखाइलो फेडोरोव्ह यांनी ट्विट करून रशियामध्ये ॲपलच्या उत्पादनांची विक्री थांबवल्याची माहिती दिली. तसेच App Store चा एक्सेस देखील बंद करण्याची मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.