Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडचा कप्तान म्हणून ओळखला जाणारा अंडर्वल्ड डॉन अबू सालेम एकेकाळी सायकल मॅकेनिक होता! वाचा त्याचा अंडरवर्ल्ड मधला संपूर्ण जीवन प्रवास

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजपर्यंत आपण अनेकजण हालाकीच्या परिस्थितीतून गरिबाचे श्रीमंत झालेले पाहिले आहेत. यासाठी प्रत्येक व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागते. मात्र असे जरी असले तरी समाजात असे अनेक लोक आहेत जे लवकर श्रीमंत होण्यासाठी दुसरा मार्ग स्वीकारतात. आणि परिणामी मग ते भाईगिरी किंवा मग गुंडाराज क्षेत्रात शिरतात. आज आपण अशाच एका अगदी सायकल मेकॅनिकल असणाऱ्या मात्र पुढे जाऊन मोठा अंडरवर्ल्ड डॉन झालेल्या एका व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत. या व्यक्तीला लोक बॉलिवूडचा कप्तान म्हणून देखील ओळखत होते.

या व्यक्तीची गोष्ट सांगायचीच झाली तर, हा बॉलिवूडचा कप्तान म्हणजे साक्षात दाऊदच्या गॅंग मधला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम! अबू सालेमचा जन्म उत्तर प्रदेशातील एका छोट्या शहरामध्ये झाला होता.

वडील पेशाने वकील असल्याने. अबूच्या घरची परिस्थिती तशी चांगली होती. मात्र एके दिवशी कोर्टातून परत येताना अबू सालेमच्या वडिलांचा अपघात झाला आणि दुर्दैवाने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. परिणामी वडिलांच्या मृत्यूनंतर अबूवर घराची जबाबदारी येऊन पडली.

घरची जबाबदारी पेलण्यासाठी आता अबू एका सायकलच्या दुकानावर काम करू लागला. मात्र या कामात त्याला खूप कमी पैसे मिळायचे. त्यामुळे त्याला घर खर्च चालवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे अबू ती नोकरी सोडत, दिल्लीला गेला. पण तिथे देखील त्याला निराशा हाती आली. परिणामी त्याने आपला मोर्चा मुंबईकडे वळवला. आणि अखेरीस मुंबईत येऊन अबू छोट्या मोठ्या सामानाची विक्री करून एका चाळीत राहू लागला.

एके दिवशी दाऊदचा लहान भाऊ अनिस इब्राहिम व अबूची भेट झाली आणि तिथूनच अबू अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय झाला. आता अबूची कामाची सुरुवात ही रात्री होऊ लागली होती.

अबू रात्री अनिस सोबत सोन्याच्या तस्करीत भाग घेत होता. पुढे काही काळाने अनिसने प्रभावित होऊन अबूला आपला उजवा हात बनवले. त्यामुळे आता अबूचे दाऊदच्या घरी येणे जाणे वाढले होते.

इतकेच काय तर अबूने आता दाऊदसाठी हप्ता वसुली करायला सुरुवात केली. त्यामुळे लोक आता अबूला भाई या नावाने ओळखु लागले होते. तसेच अबू २-३ वर्षातच दाऊदचा खास आणि विश्वासातला माणूस बनला होता.

१९९३ ला एके दिवशी संजय दत्तने अनिस इब्राहिमला फोन करून हत्यारांची मागणी केली. त्यावेळी अनिसने अबुला संजय दत्तकडे पाठवले होते. संजय दत्तला भेटायला गेलेला अबू, त्यावेळी त्याचे हातपाय थरथर कापत होते व तो घामाने पूर्ण ओलाचिंब झाला होता.

संजयने जसे अबू सालेमला पाहिले, त्यानंतर त्याने सरळ त्याची गळा भेट घेतली. या घटनेनंतर अबू सालेमच्या नावाचा बॉलिवूडमध्ये मोठा दबदबा निर्माण झाला. आणि आता अबू अनेक पार्टीजमध्ये सहभागी होऊ लागला होता.

याच काळात गुलशन कुमारचे नाव सिने इंडस्ट्रीत गाजत होते, हे बघून सालेमने गुलशन कुमारकडे ५ लाखाची खंडणी मागितली. पण गुलशन कुमार यांनी ती देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अबू सालेमने सुपारी देऊन गुलशन कुमार यांची हत्या केली.

मात्र या घटने नंतर सालेमच्या नावाचे भय बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्री यांच्या मनात निर्माण झाले. आणि इथूनच अबू सालेम बॉलिवूडचा कप्तान म्हणून ओळखला जाऊ लागला.

 

पुढे त्याने अनेक बॉलिवूड सिनेतारकांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केली. व या दोन नंबरच्या पैशातून त्याने दुबईला मोठे गाड्यांचे शोरूम उघडले होते. तसेच अबू सालेमने मुंबईत आपला दरारा निर्माण केला होता.

मात्र अबू सलेमचा हा दरारा जास्त काळ टिकला नाही. दाऊद इब्राहिमशी अबू सालेमचे भांडण झाले. या भांडणानंतर दाऊदची गँग आणि पोलीस त्याच्या मागावर होती. अबू जस-जसा मोठा होत गेला तस-तसा त्याचे शत्रू सुद्धा वाढत गेले. आणि अबुच्या मागावर पोलीस सुद्धा लागले होते.

या सगळ्यांपासून जीव वाचवण्यासाठी अबू आपली गर्लफ्रेंड मोनिका बेदी सह दुबईतून निसटून पोर्तुगालला निघून गेला. मात्र अखेरीस पोर्तुगालच्या लिस्बन येथे अबू सालेमला अटक झाली. आणि अबूला पोर्तुगालातून भारतात आणले गेले. पुढे अबू सालेमला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

-निवास उद्धव गायकवाड

 

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.