Take a fresh look at your lifestyle.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात Yellow alert; उकाडा वाढणार…

नाशिक : राज्‍यातील विविध ठिकाणी हवामान खात्‍याने अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविली आहे.

0

नाशिक : राज्‍यातील विविध ठिकाणी हवामान खात्‍याने अवकाळी पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. अशात नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. त्यानुसार सोसाट्याच्‍या वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. दरम्‍यान, काही दिवसांपासून पारा सातत्‍याने वाढत असून, ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात आणखी वाढ होणार आहे.

काही दिवसांपासून शहरवासीय तप्त उन्‍हाची अनुभूती घेत आहेत. दिवसा उन्‍हाच्‍या झळांमुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. राज्‍यस्‍तरावर अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्‍याने ढगाळ वातावरण निर्माण होत उकाडा वाढण्याची शक्‍यता आहे. प्रादेशिक हवामान खात्याने जारी केलेल्‍या अहवालानुसार सोमवार (ता. ७)पासून बुधवार (ता. ९)पर्यंत सोसाट्याच्‍या वाऱ्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. त्‍यामुळे पुढील तीन दिवस अत्‍यंत महत्त्वाचे असणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.