Take a fresh look at your lifestyle.

विराट कोहलीबद्दलच्या ट्वीटमुळे उत्तराखंड पोलीस अडचणीत; ट्रोल झाल्यानंतर केलं डिलीट!

कर्णधार विराट कोहलीविषयी ट्वीट केल्यानंतर उत्तराखंड पोलिसांना ट्रोलिंगमुळे ते ट्वीट डिलीट करावं लागलं आहे.

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

टीम इंडियाला इंग्लंडकडून टी-२० सीरिजमधल्या पहिल्याच सामन्यामध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर उत्तराखंडच्या पोलिसांनी विराट कोहलीसंदर्भात एक ट्वीट करून त्याच चाहत्यांची अजूनच नाराजी ओढवून घेतली. या ट्वीटनंतर उत्तराखंड पोलिसांना भारतीय क्रिकेट चाहत्यांनी फैलावर घेतल्यानंतर अखेर उत्तराखंड पोलिसांना हे ट्वीट डिलीट करावं लागलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला. गेल्या महिन्याभरात विराट कोहली तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला असून त्याच संदर्भात ट्वीट करून जनतेला संदेश देणं उत्तराखंड पोलिसांना अडचणीत टाकणारं ठरलं आहे.

नेमकं झालं काय?

कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाल्याची बरीच चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि विश्लेषकांमध्ये सुरू आहे. उत्तराखंड पोलिसांनी त्याचाच फायदा घेऊन लोकांमध्ये ट्रॅफिकच्या नियमांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये उत्तराखंड पोलिसांनी विराट कोहलीचा हेल्मेट घातलेला आणि मैदानातून बाहेर जातानाचा फोटो ट्वीट केला होता. त्यामध्ये पुढे त्यांनी म्हटलं होतं, “फक्त हेलमेट घालणं पुरेसं नाही. पूर्ण काळजीपूर्वक शुद्धीमध्ये गाडी चालवणं देखील गरजेचं आहे. नाहीतर कोहलीप्रमाणेच तुम्ही देखील शून्यावर बाद होऊ शकता!” या ट्वीटमध्ये पुढे #Ind vs Eng आणि #ViratKohli देखील लिहिलं होतं.

kohli-uttarakhand-police-duck-tweet

चाहत्यांचा राग…

पण विराट कोहली आणि टीम इंडियाच्या पराभवामुळे आधीच भ्रमनिरास झालेल्या क्रिकेटचाहत्यांनी आपला राग उत्तराखंड पोलिसांच्या या ट्वीटवर काढायला सुरुवात केली. काहींनी उत्तराखंड पोलिसांचा आयक्यूच काढला.

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.