Take a fresh look at your lifestyle.

पाणी टंचाई बाबत तात्काळ नियोजन करा वंचित बहुजन आघाडीची मागणी .

0

लोणार तालुक्यातील खंडाळा ,देवा नगर, सोमठाणा ,खापरखेडा ,अंजनी खुर्द, इत्यादी गावांमध्ये सद्यस्थितीतच तीव्र पाणीटंचाई भासात आहे मार्च महिन्यातच उपरोक्त गावांमध्ये पंधरा पंधरा दिवस नळ येत नाहीत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वन वन भटकावे लागत आहे. ग्रामस्थांची कुचंबना होत आहे महिला पुरुष आणि बालकांना दूरवरून डोक्यावर पाणी आणावे लागते . अजून तीव्र उन्हाळा सुरू होणे बाकी आहे आत्ताच अशी परिस्थिती असेल तर एप्रिल मे आणि जून महिन्यात काय होईल. त्यामुळे विहिरींचे अधिग्रहण किंवा टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि बंद पडलेले बोरवेल्स सुरू करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा . अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली .

तालुक्यातील ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा बाबत आढावा घेऊन ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा सुरळीत होणे बाबत उपाययोजना कराव्यात असे निवेदन देण्यात आले पंचायत समिती लोणार यांचे वतीने विस्तार अधिकारी आर.एन. मुंडे साहेब यांनी निवेदन स्वीकारले तालुक्यामध्ये भासत असलेल्या पाणी पाणीटंचाईचे तात्काळ निवारण होणे बाबत बीडिओ यांनी उपाययोजना कराव्यात अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते भाई महेंद्र पनाड, तालुका अध्यक्ष दिलीप राठोड , यांनी दिला या वेळी महासचिव सुनील इंगळे बळी मोरे ,महिला नेत्या मालती ताई कळंबे ,युवा नेते गौतम गवई, सल्लागार समाधान डोके, प्रा. शिवप्रसाद वाठोरे , रमेश प्रधान , सचिन लांडगे , दयानंद कांबळे राहुल चव्हाण, विनोद इंगळे , विकास मोरे , बद्री घुले यांचे सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.