जिल्हा परिषद शाळा कठोरा येथे जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
शब्दवाचन हंडी व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग
शेगांव :
जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथे जन्माष्टमीचे औचित्य साधून पारंपारिक उत्सव,परंपरा याची माहिती होण्यासाठी,आनंद प्राप्तसाठी,विरंगुळा घालवण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत शैक्षणिक हंडी उत्सव साजरा करण्यात आला.या हंडी मध्ये अक्षरकार्ड, शब्दकार्ड,चित्रकार्ड,संख्याकार्ड, विविध इंग्रजी शब्दकार्डे,प्रश्नावली,पाढे व चॉकलेटने भरलेली हंडी फोडून नाविन्यपूर्ण शैक्षणिक ज्ञानार्जन उत्सव आनंददायी पध्दतीने साजरा करण्यात आला.

विद्यार्थी बालगोपाळांनी आपल्याला मिळालेल्या शब्दकार्डाचे व चित्रकार्डाचे,पाढ्याचे व इंग्रजी शब्दाचे वाचन केले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात विविध प्रकारच्या माहितीची भर पडण्यास मदत झाली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा करून जन्माष्टमीच्या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
शैक्षणिक शब्दकार्ड वाचन हंडी उत्सव साजरा करण्यात उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,सुषमा खेडकर, सचिन गावंडे,दिपक चव्हाण,शालेय पोषण आहार कर्मचारी कविता गवळी यांनी अथक परिश्रम घेतले.
याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.