जि.प.शाळा कठोरा येथे म.फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न
सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतीबा फुले यांना अभिवादन
सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतीबा फुले यांना अभिवादन
जि.प.शाळा कठोरा येथे म.फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न
शेगांव :-
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। असे महात्मा ज्योतीबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे,बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातीभेद नष्ट करून सामाजिक परिस्थिती सुधरविण्याचे कार्य संपुर्ण आयुष्यभर केले आहे.त्यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली मराठी शाळा व अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली.मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती घडवून महिलांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी करून दिलीत त्यामुळे प्रशासकीय,शैक्षणिक व सर्वच क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे, याची जाणिव ठेवत जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथील मुलींनी नतमस्तक होऊन त्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करून कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी प्रासंगिक माहितीपर भाषणे दिलीत,बासरीवादक रामदास अहिरे यांनी देशभक्तीपर गीते सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.प्रास्ताविक भाषणामध्ये उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
याप्रसंगी शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,पुरूषोत्तम सपकाळ,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी,शालेय पोषण आहार मदतनीस कविता गवळी व शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
म.फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करतांना शिक्षक वृंद