Take a fresh look at your lifestyle.

ऐतिहासिक व पर्यटन‎ स्थळांना कठोरा शाळेतील विद्यार्थ्यांची भेट

५१ विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल उत्साहात‎ संपन्न

0

शेगांव : 
विद्यार्थी अवस्थेतील शालेय सहली आयुष्यभर आठवणीत राहतात, पर्यंटनाबरोबर त्या स्थळाची माहिती आणि अभ्यास होतो आणि आनंद प्राप्ती होते शालेय उपक्रमाचा एक भाग म्हणून शैक्षणिक सहलीकडे बघितल्या जाते.शैक्षणिक दृष्टींने महत्वाचे असणाऱ्या स्थळावर विद्यार्थ्यांना घेऊन जाने , परिवर्तन करणे हा अभ्यासाचा भाग असतो.विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि बुद्धीत आणखी भर पाडणे हा शैक्षणिक सहल काढण्यामागे शाळेचा प्रामुख्याने उद्देश असतो. या सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान , निरीक्षण , प्रयोग क्षमता आदींचा किमान विकास होईल असे जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या जाते,
शैक्षणिक सहल म्हणजे विद्यार्थ्यांत आपलेपणा , नाते निर्माण होईल. अनौपचारिक शिक्षण सहलीतून जितके होते तीच सहल स्वावलंबनाचा गुंफण तयार करते,हा सकारात्मक उद्देश ठेवून पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कठोरा येथील ५१ विद्यार्थ्यांची एकदिवसीय शैक्षणिक सहल संभाजी नगर,दौलताबाद,घृष्णेश्वर मंदिर,वेरूळच्या लेण्या ,बिबिका मकबरा,पवण चक्की,राष्ट्रीय उद्यानातील प्राणी संग्रहालय आदी ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळावर नेण्यात आली होती.
या सहलीमध्ये शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,शिक्षक सुरेश डोसे,सचिन वडाळ,अर्जुन गिरी,शालेय पोषण आहार कर्मचारी कविता गवळी यांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळाची माहितीचे मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.