Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळ्यात रस्त्यावर जागोजागी मिळणारे कलिंगड आपल्या आरोग्यावर करते ‘असे’ परिणाम

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हिवाळ्याची थंडी कमी होऊ लागली की आपल्याला उन्हाळ्याची चाहूल लागू लागते. अचानक उन्हाचे चटके लागू लागतात. रखरखते ऊन मात्र अंगाची अगदी लाहीलाही करते. मग अशावेळी आपल्याला आठवण होते ती मात्र, थंड पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची. याच आठवणीत आपले पाय हे थंड पेय पिण्यास जसे की लिंबू सरबत, रसना आणि ऊसाचा रस अशा सारख्या गोष्टींकडे किंवा मग उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ म्हणजे, आंबा किंवा कलिंगडाकडे वळतात.

मात्र उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ले जाणारे कलिंगडाचे महत्व काय?त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात? हे आपणास माहीत आहे का? नाही ना चला तर मग जाणून घेऊयात उन्हाळ्यात खाल्ले जाणाऱ्या कलिंगडाचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसी, पंखा, कूलर हे आपल्या शरीराला बाहेरून काही काळापुरता थंडावा पोहोचवत असले तरी कलिंगड हे आपल्या शरीराला आतून थंड करण्याचे काम करते. त्यामुळे लोक उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन आवर्जून करतात.

कलिंगड हे शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक असते. तसेच, कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. त्यामुळे जेव्हा तीव्र उन्हामुळे उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून आपल्या शरीरातील पाणी निघून जाते. त्याचवेळी आपल्या शरीरातून घामाद्वारे खनिजेही निघून जातात. अशावेळी कलिंगड शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा ऱ्हास भरून काढतात.

याच सोबत कलिंगडाच्या सालींचा सुद्धा आपल्याला उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आता तुम्ही म्हणाल ते कसे? तर, जेव्हा कडक उन्हाळ्यात अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. अशावेळी उन्हातून घरी आल्यानंतर कलिंगडाची साल डोक्यावर ठेवावी. यामुळे थंडावा वाढतो.

त्याचप्रमाणे प्रखर उन्हामुळे डोळ्यांची जळजळ होत असल्यास कलिंगडाची साल डोळ्यावर ठेवल्याने डोळ्याला थंडावाही मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात मिळणारे कलिंगड माणसाने आवर्जुन खावे. आणि उन्हाळ्यात आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे.

-निवास उद्धव गायकवाड

 

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.