Take a fresh look at your lifestyle.

इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून जल्लोषात स्वागत

0

शेगांव :
उन्हाळ्याच्या दिर्घ सुट्टीनंतर जिल्हयातील संपुर्ण शाळा ३० जुन रोजी सुरू झालेल्या असुन शाळा प्रारंभीच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या नवोगत विद्यार्थ्यांचे व शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
शाळेच्या संदर्भातील चला,चला शाळेत चला,शाळा शिकायचे बाई,आता घरी राहायचे नाही असे आनंददायी व उत्साहवर्धक नारे विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी मध्ये दिले. विद्यार्थ्यांना कुंकुम तिलक लावून औक्षण करण्यात आले, पुष्पगुच्छ देऊन चाॅकलेटे वाटप करण्यात आली.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय खवले व इतर मान्यवरांच्या हस्ते शालेय पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन गावंडे,दिपक चव्हाण, सचिन वडाळ,सुषमाताई खेडकर,अंगणवाडी सेविका कोकिळाताई खवले व शालेय विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

प्रभातफेरीमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे नारे देतांना विद्यार्थी व उपस्थित शिक्षकवृंद

Leave A Reply

Your email address will not be published.