Take a fresh look at your lifestyle.

काय! आपल्यालाही मुतखडा झालाय? तर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी; अन्यथा..

0

आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

एखाद्या व्यक्तीला कधी कोणता रोग किंवा आरोग्याची समस्या उद्धभवेल सांगता येत नाही. मात्र अचानक उद्धभवलेल्या आरोग्याच्या समस्येने आपल्याला अनेक प्रकारे त्रास होतो.

सोबतच जर अचानक आरोग्याची समस्या उध्वभवली तर आपल्याला आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागते. मग असे अचानक उद्धभवणारे अनेक आजार असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशाच एका आजाराविषयी म्हणजेच किडनी स्टोन अर्थात मुतखड्याविषयी माहिती सांगणार आहोत.

एखाद्या माणसाला जर एकदा किडनी स्टोन असेल तर दुसर्‍या वेळी असे होणार नाही असे लिहिलेले नाही; परंतु जर काही गोष्टींची काळजी घेतली गेली तर भविष्यात तसे होणार नाही अशी शक्यता आहे.

यासाठी आपल्याला खाली दिलेले उपाय पाळणे खूप गरजेचे आहे. जेणे करून आपल्याला किडनी स्टोन पासून बाचाव होऊ शकतो.

१) कॉफीचे सेवन कमी करा :- कित्येकवेळा आपल्याला कॉफी पिण्याची सवय असल्यामुळे, मूत्रपिंड खडे पुन्हा तयार होण्यास जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे किडनी स्टोन झालेल्या व्यक्तीने कॉफीचे सेवन कमी करणे कधी ही चांगले आहे.

तसेच कॉफीच्या सेवनाबरोबरच किडनी स्टोन झालेल्या व्यक्तीने सोडा, चहा आणि कॅफिनचे जास्त प्रमाणात असलेले पेय पिणेही टाळले पाहीजेय.

२) पाण्याचे योग्य प्रमाण:- किडनी स्टोन झालेल्या व्यक्तीने दिवसातून किमान आठ ते बारा ग्लास पाणी प्यायला हवे. कारण आपण जितके जास्त पाणी प्याल तितके लहान स्फटिक दगडांच्या रूपात एकत्र जमणार नाहीत. परिणामी ते मूत्रामधून शरीराच्या बाहेर निघून जातील.

३) मांसाहार टाळा:- मांसाहारी सेवन केल्याने आपल्या शरीरात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढते. परिणामी यूरिक ऍसिडच्या वाढीमुळे मूत्रपिंडात खडे देखील त्यात होतात. त्यामुळे आपल्याला पुन्हा किडनी स्टोनच त्रास नको असेल तर मांसाहार टाळलेलाच बरा.

४) लिंबूवर्गीय फळांचे जास्त प्रमाणात सेवन करा:- मूत्रपिंडातील दगड असलेल्या बहुतेक रुग्णांमध्ये साइट्रिक ऍसिडची कमतरता आढळते. त्यामुळे आपले मूत्रपिंड निरोगी राहण्यासाठी आपण संत्री, लिंबू इत्यादी फळांच्या रसाचे नियमितपणे सेवन करू शकतो. हे सेवन केल्यास किडनी स्टोन झालेल्या व्यक्तीस मूत्रपिंड खड्यांची पुनरावृत्ती होत नाही.

५) मीठ कमी खा:- जेव्हा आपण जास्त मीठ खातो तेव्हा मूत्रात कॅल्शियमचे प्रमाण वाढते. जेणेकरून भविष्यात मूत्रपिंड खडे तयार होतात. त्यामुळे जर आपणही जास्त मीठ खात असाल किंवा अन्नावर मीठ टाकण्याची सवय असेल तर ती सवय बदला आणि मीठ कमी खाण्याची नवीन सवय अंगिकारून घ्या. यामुळे आपल्याला किडनी स्टोन सारख्या आजाराला सामोरे जावे लागणार नाही.

-निवास उद्धव गायकवाड

 

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.