लासुरा येथे हिवताप जनजागृती मोहिम संपन्न
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत असलेल्या ग्राम लासुरा येथे हिवताप मोहिमेअंतर्गत हिवताप संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शेगांव :
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत असलेल्या ग्राम लासुरा येथे हिवताप मोहिमेअंतर्गत हिवताप संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. भंगार सामान, टायर्स याची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसवाव्यात. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा,आठवड्यातून एकवेळा पाणी साठवण्याचे भांडे रिकामी करून घासून स्वच्छ करावी,नाली,गटारे यामध्ये पाणी साचून देऊ नये,डास उत्पत्ती होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय करावा याकरिता नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन सी.एच.ओ.डाॅ.लखोटिया यानी केले आहे.
याप्रसंगी आरोग्य सहाययक रमेश निखाडे,सरोदे,उषा मुंडे,आशा सेविका सविता मुकुंदे,वंदना जवंजाळ, अंगनवाडी सेविका संगीता मोरखडे,डोंगरकार व मदतनीस उपस्थित होत्या.
हिवताप जनजागृती मोहिम या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित महिला व आरोग्य कर्मचारी
हिवताप विषयासंदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना आरोग्य विभागातील कर्मचारी.