Take a fresh look at your lifestyle.

प्रेग्नेंसीची काळात महिलांनी घ्यावा ‘हा’ पोषक आहार; त्यामुळे आईच्या आणि बाळाच्या आरोग्यावर होतील ‘असे’ परीणाम

0

एखाद्याच्या घरात नवजात बालकाचा म्हणजेच नव्या पाहुण्याचा जन्म व्हायचा म्हणले की, घरातलं वातावरण अगदी आनंदाचा असते. नव्या पाहुण्याची चाहूल ही सर्वांनाच लागलेली असते.

मात्र अशातच जी महिला आपल्या बाळाला जन्म देणार आहे. त्या आईची शारीरिक परिस्थिती काय असते हे ज्याचं त्यालाच ठाऊक असते.अशा परिस्थितीमध्ये प्रेग्नेंसीमध्ये महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एवढेच काय तर या परिस्थितीतून सामोरे जात असताना त्या गर्भवती महिलेला भयंकर त्रास सुद्धा सहन करावा लागतो.

या सर्व गोष्टींचा परिणाम हा थेट पोटातल्या मुलावर होत असतो. आणि म्हणूनच आईचे आणि पोटातल्या बाळाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आम्ही आजच्या लेखात प्रेग्नेंसीच्या काळात घ्यावयाचा योग्य आहार सांगणार आहोत.

१) दुग्धजन्य उत्पादने:- गर्भवती महिलेने दिवसात दूध प्यालाभर प्याले पाहिजे. चीज, कॉटेज दही, ताक, गर्भधारणेदरम्यान खाल्ले पाहिजे. कारण की गर्भधारणेदरम्यान, शरीरात कॅल्शियम अभाव असतो. पण शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दुरुस्त करण्यासाठी जास्त डेअरी उत्पादनेही खाऊ नयेत.

२) फळांचा आहार:- फळांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गरोदरपणात फळांचे सेवन केल्याने त्वचेशी संबंधित समस्या देखील दूर होतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी अधिकाधिक फळांचे सेवन करावे.

३) डाळी:- डाळींमध्ये भरपूर लोह, जस्त, कॅल्शियम, फोलेट आढळतात. ती शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी जास्तीत जास्त डाळींचे सेवन केले पाहिजे.

४) पालक भाजी:- पालकात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियम असतात जे शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान पालकच्या भाजीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. असे केल्याने गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्यास फायदा होतो.

-निवास उद्धव गायकवाड

Leave A Reply

Your email address will not be published.