दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटतांना मनसगाव शाळेचे चिमुकले बालगोपाळ विद्यार्थी
जिल्हा परिषद मनसगाव शाळेत दहीहंडी उत्सव साजरा
शेगांव
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा मनसगाव येथे गोपाळकाल्याचे औचित्य साधून बालकांचा आनंद व उत्साह द्विगुणित व्हावा या उद्देशातून दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
पारंपरिक संस्कृतीचे जतन व्हावे,सणाची माहिती व्हावी,आनंद प्राप्ती व्हावी या हेतूने विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव व विद्यार्थ्याच्या भावना जोपासत सदर सहशालेय उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सदर उपक्रमामुळे दहीहंडी उत्सवाचा विद्यार्थ्यांनी चांगलाच आनंद उपभोगला आहे.
याप्रसंगी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती सविता हेलोडे, शिक्षिका कु.नितल खंडारे,कु.शिला इंगळे,शिक्षक प्रभाकर सुर्यवंशी,प्रशांत नागे,शालेय पोषण आहार कर्मचारी किशोर कराळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.