जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुषमा खेडकर यांची क्रीडा स्पर्धेत उत्तुंग भरारी
प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने महिला खेळाडू सुषमा खेडकर यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पैठणी देऊन यथोचित सन्मान
शेगांव :
जिल्हा परिषद क्रिडा स्पर्धेत जि.प.शाळा जलंब (मुले) येथे कार्यरत असलेल्या महिला शिक्षिका सुषमा खेडकर यांनी जिल्हास्तरिय विविध खेळामध्ये उत्तुंग कामगिरी करून विजेतेपद व उपविजेतेपद मिळविल्याबद्दल जि.प.शाळा माटरगाव खुर्द येथे आयोजित करण्यात आलेल्या कठोरा व माटरगाव केंद्राच्या संयुक्त शिक्षण परिषदेमध्ये नारी शक्तीचा सन्मान व्हावा,महिलांचे सक्षमीकरण व्हावे व विभागीय क्रिडा स्पर्धेमध्येही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने तालुकाध्यक्ष सुनिल घावट,उपाध्यक्षा रजनी धारपवार यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पैठणी भेट वस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
सुषमा खेडकर यांनी बॅडमिंटन एकेरी (महिला) क्रिडा स्पर्धेमध्ये मोताळा संघ विरूध्द शेगांव संघामध्ये चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये विजेतेपद प्राप्त केले तर बॅडमिंटन दुहेरी ( महिला ) सामन्यामध्ये सुध्दा बुलडाणा संघ विरूध्द शेगांव संघामध्ये रोमहर्षक झालेल्या सामन्यामध्ये सुद्धा सुषमा खेडकर व प्रेमा उईके यांनी विजेतेपद प्राप्त केले,व्हाॅलीबाॅल पासिंग (महिला) खामगांव संघ विरूध्द शेगांव संघामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून शेगांव संघाला विजय प्राप्त करून विजेतेपद प्राप्त केले,वैयक्तिक क्रिडा स्पर्धेमध्ये १०० मिटर धावणे (महिला ) यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद तर गोळाफेक (महिला) या क्रिडा स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून उपविजेतेपद प्राप्त केले.

त्यांच्या या सांघिक व वैयक्तिक उत्कृष्ट खेळाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्यावतीनेही नुकतेच त्यांना वैयक्तिक क्रिडास्पर्धेचे चार प्रशस्तीपत्रे,चषक देऊन तर सामुहिक सांघिक खेळामध्ये प्रशस्तीपत्र व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
क्रिडा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने त्यांचा प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी दिलीप बळी, सचिन वडाळ,अनिल खेडकर,दिलीप भोपसे,सचिन गावंडे,अर्जुन गिरी आदि पदाधिका-यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले आहे.
याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके व गजानन गायकवाड,कठोरा केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद इंगळे,माटरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख इंदुमती डाबेराव अंनतराव वानखडे,सुरेश डोसे,संजय महाले,राहुल काळमेघ,डिंगाबर काकड आदि बहुसंख्य शिक्षकांची उपस्थिती होती.