वाढत्या तापमानामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्या.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेची निवेदनामार्फत मागणी
बुलडाणा :
दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होतांना दिसुन येत असुन उन्हाची तीव्रता खुप वाढलेली आहे, ग्रामीण भागातील शाळांच्या अडचणी लक्षात घेता पाणीटंचाई,पिण्याच्या शुद्ध पाण्याचा तुटवडा,आटत चाललेले पाण्याचे स्रोत,बदलते हवामान या सर्व बाबींचा विचार करुन शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी प्रकाश मुकुंद’शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बुलडाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता आणखीन यापेक्षाही जास्त वाढणार आहे . या उन्हाच्या तीव्रतेमुळे मुलांना त्रास होतो. दुबार भरत असलेल्या शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात भरविल्यास अध्ययन अध्यापन प्रक्रिया चांगली होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळ सत्रात भरविण्यात याव्यात असे अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आलेली आहे.

फेब्रुवारी महिनाच्यापासूनच तापमानात वाढ झालेली आहे आणि तापमानात सातत्याने वाढ होत आहे.सध्या विदर्भात अनेक ठिकाणी ३५ ते ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे.तापमान सामान्य स्थितीपेक्षा पाच ते नऊ अंशांनी तापमान जास्त आहे म्हणून विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सकाळच्या सत्रात शाळा नऊ मार्च अथवा दहा मार्च पासुन सुरू करण्यात याव्यात.
– महेंद्र रोठे,जिल्हाध्यक्ष
प्रहार शिक्षक संघटना बुलडाणा