Take a fresh look at your lifestyle.

शेगावातील विकर्तन इंगळे व शितल वानखडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रहारच्यावतीने सत्कार

जिद्द,चिकाटी व मेहनतीमुळे दोघेही बहिणभावांनी निट परिक्षेत प्राप्त केले अव्वल स्थान

0

शेगांव
रोकडिया नगर येथे रहिवाशी असलेले राज इंगळे व जयवंतराव वानखडे या शिक्षकांच्या मुलांनी व नात्याने बहिणभाऊ असलेल्या दोन्हीही गुणवंत विद्यार्थ्यांनी निट परिक्षेत दैदीप्यमान यश संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात शेगांवचे नाव उज्ज्वल केले आहे.विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे,कौतुकाची व प्रेरणेची पाठीवर थाप असावी या हेतूने प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने त्यांच्या घरी भेट जाऊन पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा सन्मान व कौतुक करण्यात आले आहे.
विकर्तन राज इंगळे याने नीट
परीक्षेत ७२० पैकी ६४३ गुण तर शितल जयवंतराव वानखडे हिने ५२४ गुण प्राप्त करून वैद्यकीय क्षेत्रात आपला प्रवेश निश्चित केलेला असुन वैद्यकीय क्षेत्रामध्ये यशस्वी होऊन रूग्णसेवा करण्याची मनिषा याप्रसंगी व्यक्त केली आहे.
भारतीय बहुजन महासंघ महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा असलेल्या वर्षा राज इंगळे यांचा विकर्तन इंगळे सुपुत्र व शितल वानखडे ही भावाची मुलगी असल्यामुळे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व परिसरातील सर्व स्तरातून दोन्हीही भावंडांवर कौतुकाची थाप व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या प्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट,विजय टापरे,प्रशांत नागे,गटसाधन केंद्राचे विषय शिक्षक विक्रम फुसे,योगेश गणोरकार, विनोद वैतकार,श्रीकांत सोनोने,समर्पण राज इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांना प्रेरणा देणा-या त्यांच्या आईवडिलांचा सन्मान करतांना प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.