Take a fresh look at your lifestyle.

जिल्हयात सहकार क्षेत्रामध्ये प्रहार शिक्षक संघटनेची मुसंडी

प्रहार शिक्षक संघटनेच्या रजनी धारपवार यांची शिक्षक पतसंस्थेच्या उपाध्यक्ष पदी निवड

0

शेगांव :
जिल्हयात प्रहार शिक्षक संघटनेची स्थापना झाल्यानंतर संघटनात्मक कार्यपद्धतीच्या जोरावर शिक्षण क्षेत्रामध्ये व सहकार क्षेत्रामध्ये अल्पकालावधीतच प्रहार शिक्षक संघटनेने मुसंडी घेतली आहे.

पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रजनीताई धारपवार यांचा यथोचित सन्मान करतांना प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी
पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रजनीताई धारपवार यांचा यथोचित सन्मान करतांना प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी

जि.प.शाळा जलंब (मुले) येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका व प्रहार शिक्षक संघटनेच्या तालुका उपाध्यक्षा रजनी धारपवार यांची पंचायत समिती प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था र.न.९५३ च्या उपाध्यक्ष पदावर निवड झालेली असुन त्यांची निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनानुसार तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पैठणी देऊन प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला आहे.

याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सचिन वडाळ,सुषमा खेडकर आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.