Take a fresh look at your lifestyle.

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठाराचा असणार समावेश

‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे.

0

यंदाच्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्‍यासाठी ही बाब भूषणावह ठरणार आहे.

प्रजासत्ताकदिनी नवी दिल्ली येथील परेडमध्ये प्रत्येक राज्याचे चित्ररथ असतात. या चित्ररथामधून प्रत्येक राज्य आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असते. यंदा दिल्ली येथे होणार्‍या परेडमध्ये राज्याची समृद्ध जैवविविधता दाखवणे या उद्देशाने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. मुख्य मॉडेल कास पठाराचे असेल जे चित्ररथाच्या अग्रभागी मध्यभागी ठेवले जाईल.

कास पठाराला फुलांची व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम घाटावरील जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणून २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को)ने जागतिक नैसर्गिक वारसास्थळ घोषित केले होते. हे विविध प्रकारच्या हंगामी वन्य फुलांसाठी आणि स्थानिक फुलपाखरांच्या प्रजातींसाठी ओळखले जाते. कास पठार १० चौरस किमी परिसरात पसरलेले आहे. फुलांच्या ८५० पेक्षा जास्त प्रजाती या पठारावर आढळून येतात. ज्यात ऑर्किड, झुडूप आणि मांसाहारी वनस्पतींचा समावेश आहे. त्यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बनले आहे.

कास पठाराप्रमाणेच माळढोक पक्षी, ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि खेकड्याच्या नवीन शोधलेल्या प्रजातींचे मॉडेल देखील असणार आहेत. याशिवाय वाघ, फ्लेमिंगो, मासे, गिधाड आणि घुबडाचे मॉडेल असणार आहेत. शेकरू हा राज्यप्राणी तर हरियाल हा राज्यपक्षी आहे. ‘ब्लू मॉर्मन’ हे राज्य फुलपाखरू असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्याच्या चित्ररथात फुलपाखराचे आठ फूट उंच आणि सहा फूट रुंद मॉडेल असेल. मॉडेल घेऊन जाणार्‍या स्टेजला जारुल आणि ताम्हण या राज्य फुलांनी सुशोभित केले जाणार आहे.

या चित्ररथासाठी कास पठार आणि त्याची जैवविविधता याबाबत शासनाकडून माहिती मागविण्यात आली होती. प्रजाकसत्ता दिनाच्या सोहळ्यात याचा समावेश झाल्याची माहिती मिळाल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.

 


[cardoza_facebook_like_box]

वार्ताहर नेमणे आहेत

मराठी बातम्या मिळवा आता टेलीग्रामवर.. आमचं चॅनेल (@Batmyaa) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.