Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुखरुप

मुंबई : मंगळवारी रात्री साडेअकराच्या आसपास मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर हा अपघात झाला.

0

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील दोन वाहनांचा काल रात्री उशीरा अपघात झाला. मुंबई महानगरपालिकेजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा किरकोळ अपघात झाला असून त्यामध्ये कोणीही जखमी झालेली नाही. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदेही सुखरुप आहेत. मंगळवारी रात्री साडेअकराच्या आसपास हा अपघात झाला.

शिंदे हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देऊन पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्षाला भेट देण्यासाठी येत असतानाच हा अपघात झाला. पालिका मुख्यालयाजवळ त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांना धडकल्या. ताफ्यातील एका कारने दुसऱ्या कारला मागून जोरदार धडक दिली. पुढे चालणाऱ्या कारने अचानक ब्रेक दाबल्याने त्या मागून येणाऱ्या कारच्या चालकाला काही समजण्याआधीच दोन्ही गाड्यांची धडक झाली.

पुढील कार अचानक थांबल्याने मागून येणाऱ्या कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला. मात्र पालिका मुख्यालयाजवळ असल्याने गाड्यांचा वेग कमी होता, त्यामुळेच या अपघातामध्ये कोणीही जखमी झालं नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.