Take a fresh look at your lifestyle.

Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत स्फोट, 21 जणांचा मृत्यू; 60 जखमी

Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला.

0

Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात २१ जणांचा मृत्यू तर ६० जण जखमी झाले आहेत, ज्यात ५ लहान मुलांचा समावेश. मिळालेल्या माहितीनुसार, खैर खाना परिसरातील मशिदीत हा स्फोट झाला. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. काबूल सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद जद्रान स्फोटाची माहिती देताना यांनी सांगितले की, काबूलच्या पीडी 17 येथील मशिदीत बॉम्बस्फोट झाला. ते म्हणाले की, आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

गेल्या अनेक महिन्यांत असे अनेक हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये शिया मशिदींना लक्ष्य करण्यात आले. पण या हल्ल्यात एक नवीन गोष्टही समोर आली आहे. आज ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागात शिया लोकसंख्या नाही. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचे सरकार आहे. तालिबान सरकारला आत्ता एक वर्ष पूर्ण झाले आहे. अश्रफ घनी यांचे सरकार हटवल्यानंतर तालिबानने तेथे ताबा मिळवला. 29 एप्रिल रोजी, काबूलमधील मशिदीमध्ये धार्मिक विधी करत असलेल्या अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य करण्यात आलेल्या हल्ल्यात 10 लोक मारले गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.