Take a fresh look at your lifestyle.

शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातून लवकरच राजकीय क्षेत्राकडे वाटचाल. – उध्दव नागरे

0

मी सुरूवातील शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक म्हणून काम केले आहे.सामाजिक क्षेत्रात काम करत असताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविणे हे सुद्धा काम करत आहे.त्यामुळे सर्कल मधील नागरिकांच्याा सतत संपर्कात आहे.

कोणत्याही परिस्थिती मध्ये लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द पंचायत समिती सर्कल निवडणूक लढवणार आहे व जिंकणार सुद्धा आहे , आता माघार नाही मग समोर कोणीही असेल तरी चालेल .आता या अंजनी खुर्द पंचायत समिती सर्कल च्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार आहे .आर या पार लढाई होईल पण सामान्य जनतेला सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची आहें ती जिंकण्यासाठी….सर्कल मधील नागरिकांसाठी ,त्यांच्या प्रश्नासाठी ,मी तुमचा प्रतिनिधी म्हणून एक अजेंडा समोर ठेऊन ,सर्कल मधील गावांचा विकास करण्यासाठी प्रत्येक वर्गाला धरून ब्लू प्रिंट तयार केली आहे.लवकरच मी पत्रकार परिषद घेणार आहे. व पुढील पाच वर्षाचे प्रत्येक गावचे विकास्त्मक्त नियोजन मी जाहीर करणार आहे.

जनतेने मला संधी द्यावी,मी संधीचे सोने करून जनतेला न्याय देण्याचे काम करणार आहे.त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे.

गोर गरिबांचे पोर सुद्धा लोकप्रतिनिधी झाले पाहिजेत हीच माफक अपेक्षा आहे…येणाऱ्या पुढील 25 वर्षाच्या नियोजनासह कोणत्याही परिस्थितीत आता मिशन
पंचायत समिती.

Leave A Reply

Your email address will not be published.