Take a fresh look at your lifestyle.

शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न

0

शेगांव :
पंचायत समिती अंतर्गत कठोरा केंद्रांतर्गत समाविष्ट असलेल्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शालेय विद्यार्थ्याच्या जि.प.उच्च प्राथमिक शाळा सगोडा येथील प्रांगणात केंद्रप्रमुख प्रमोद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा स्पर्धेचे उद्घाटक रवींद्र बाठे,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सगोडा यांच्या हस्ते करण्यात आले तर बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू घोगले मुख्याध्यापक व प्रमुख अतिथी म्हणून शा.व्य. समितीचे उपाध्यक्ष संतोष वैतकार,सुनील बाठे,अनंतराव वानखडे,सुनिल घावट हे लाभले होते

शालेय क्रिडा स्पर्धेमध्ये कबड्डी ,खो,खो,धावणे आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडा स्पर्धेमध्ये कबड्डी ( मुले ) खेळामध्ये इयत्ता १ ते ५ च्या जि.प.शाळा सगोडा येथील विद्यार्थ्यांनी विजेतेपद तर जि.प.शाळा, चिंचखेड येथील विद्यार्थ्यांनी उपविजेतेपद, कबड्डी ( मुली ) प्राथमिक गट जि.प.कें.उ.प्राथमिक शाळा कठोरा शाळेतील विद्यार्थ्यांनी विजेतेपद तर जि.प.शाळा,चिंचखेड या शाळेतील विद्यार्थ्यांनी उपविजेतेपद,उच्च प्राथमिक गट कबड्डी ( मुले ) मध्ये जि.प.उच्च प्राथ. शाळा, सगोडा शाळेतील विद्यार्थ्यांनी विजेतेपद तर जि.प.उच्च प्राथ.शाळा भास्तन (जुने) येथील विद्यार्यांनी उपविजेतेपद, कबड्डी (मुली) जि.प.उच्च प्राथ. शाळा ,भास्तन(जुने)- विजेतेपद तर जि.प.उच्च प्राथ.शाळा, सगोडा उपविजेतेपद,खो खो मुले उच्च प्राथमिक गटामध्ये जि.प.उच्च प्राथ.शाळा,सगोडा विजेतेपद तर जि.प.उच्च प्राथ.शाळा, भास्तन(जुने) उपविजेतेपद खो,खो (मुली)जि.प.उच्च प्राथ. शाळा,सगोडा विजेतेपद तर जि.प.उच्च प्राथ.शाळा, भास्तन(जुने) उपविजेतेपद तर वैयक्तीक स्पर्धेत १०० मिटर धावणे ( मुले ) इयत्ता १ ते ५ यामध्ये जि.प.कें.व.प्राथमिक शाळा कठोरा येथील गणेश खवले प्रथम क्रमांक तर जि.प.शाळा भास्तन जुने येथील रमन ब्रम्हानंद मिरगे याने द्वितीय क्रमांक,मुलीमध्ये गायत्री डांगे,चिंचखेड प्रथम क्रमांक तर रोशनी गवळी कठोरा या विद्यार्थीनीने द्वीतीय क्रमांक, उच्च प्राथमिक गटातून धावणे ( मुले ) स्पर्धेमध्ये कार्तिक पातूर्डे, सगोडा प्रथम क्रमांक तर मोहन देठे डोलारखेड याने द्वितीय क्रमांक ,उच्च प्राथमिक गट १०० मीटर धावणे ( मुली ) श्रावणी देठे, डोलारखेड प्रथम क्रमांक तर अंकिता इंगळे सगोडा द्वितीय क्रमांक पटकाविलेला असुन सदर विजेत्या स्पर्धकांचा शिल्ड,पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

कबड्डी स्पर्धेमध्ये कठोरा येथील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविल्याबद्दल शिल्ड देऊन सन्मान करतांना उपस्थित मान्यवर

सदर क्रिडा स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल केसकर तर प्रास्ताविक माणिकराव देशमुख यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.