Take a fresh look at your lifestyle.

प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आदिती सुर्यवंशी व प्रियांशू मसने यांचे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सुयश

0

शेगांव :
केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली होती.या प्रवेश परीक्षेतून भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन स्तरावर विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तपासली जाते,सदर प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असुन जि.प.शाळा मनसगाव येथे कार्यरत असलेले शिक्षक प्रभाकर सुर्यवंशी यांची सुकन्या आदिती सुर्यवंशी व जि.प.शाळा तरोडा डी या शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक प्रविण मसने यांचा सुपुत्र प्रियांशु मसने यांनी सदर नवोदय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केलेली असुन सदर एन. व्ही. चिन्मय विद्यालयाचे विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरलेले आहेत.
या यशाचे श्रेय ते आई,वडील व मार्गदर्शन करणा-या शिक्षकांना देत आहेत.
त्यांच्या या सुयशाबद्दल प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने तालुकाध्यक्ष सुनिल घावट,विजय टापरे,प्रशांत नागे,सचिन वडाळ,सचिन गावंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

आदिती सुर्यवंशी व प्रियांशू मसने यांचे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सुयश

Leave A Reply

Your email address will not be published.