Take a fresh look at your lifestyle.

शिक्षकांचे वेतन एक तारखेला अदा करा

0

शेगांव :
महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षकांच्या वैयक्तिक व सामुहिक प्रशासकीय प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) किशोर पागोरे व मुख्य वित्त लेखाधिकारी गायकवाड यांचा जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय प्रलंबित समस्या सोडविण्याबाबतची प्रक्रिया अंतीम करण्याबाबत चर्चा करण्यात आली,यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे ऑनलाईन बदली प्रक्रियेपूर्वी समुपदेशनाद्वारे त्वरित स्थानांतर करण्यात यावे,जिल्ह्यातील शिक्षकांची पदोन्नतीकरिता बिंदुनामावली व रोस्टर प्रक्रिया अंतीम करण्यात यावी,शिक्षकांच्या बदली संदर्भातील अवघड क्षेत्रातील गावाची यादी प्रकाशीत करण्यात यावी,ऑनलाईन बदली प्रक्रियेपूर्वी शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,उच्चश्रेणी मुख्याध्यापक व पदविधर शिक्षक या पदाची पदोन्नती प्रक्रिया अंतीम करण्यात यावी,शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला होण्याच्या अनुषंगाने वेतन सी.एम.पी.,झेड.पी.एफ.एम.एस.वेतन प्रणाली कार्यन्वीत करण्यात यावी,जिल्हास्तरावर प्राप्त झालेल्या चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव मंजुर करणे,लगतच्या जिल्हयाप्रमाणे २४ वर्ष सेवाकाळ पुर्ण झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी लागु करण्यात यावी, आर्थिक वर्ष २०२१-२०२२ या वर्षातील अनुदान प्राप्त असलेल्या वैद्यकीय देयकांना मंजुरात प्रदान करण्यात यावी,समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेला प्राप्त झालेले संयुक्त शाळा अनुदान व इतर अनुदान शाळेच्या बॅक खात्यात पुन्हा समायोजित करण्यात यावे,उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत तांदूळ व धान्यादी माल वितरीत करणेबाबत, दरमहा प्राथमिक शिक्षकांचे वेतन एक तारखेला अदा करणेबाबत,शिक्षकांना आर्थिक वर्ष २०२१-२०२२ च्या भविष्य निर्वाह निधी कपात संदर्भातील स्लीप मिळणेबाबत,शिक्षकांची सेवा पुस्तके अद्यावत करण्यासाठी तालुकास्तरिय कॅम्प आयोजित करणेबाबत,अंपग प्रवर्गातील रिक्त असलेला अनुशेष भरून अंपग शिक्षकांना पदोन्नती मिळणेबाबत,शिक्षकांची कोरोना संसर्ग आजारपणाची व इतर आजारपणाची वैद्यकीय देयके तात्काळ अदा करणेबाबत,शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अद्यावत करणेबाबत,जिल्हास्तरावरील अद्यावत करण्यासाठी पाठविण्यात आलेली शिक्षकांच्या सेवापुस्तकांची तात्काळ पडताळणी करणेबाबत,डिसीपीएस धारक शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हफ्ता अदा करण्यात यावा यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असता सदर विषय तात्काळ सोडविण्याचे आश्वासन याप्रसंगी शिक्षणाधिकारी किशोर पगोरे यांनी दिले.
सदर निदनाच्या प्रतिलिपी शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडु व प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेशजी ठाकरे यांना पाठविण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी सरचिटणीस देविदास,कार्याध्यक्ष गणेश नरोटे,संघटक गजानन दराडे,उपाध्यक्ष धनराज धंदर,अविनाश घुगे,मुरलीधर टाकरस,प्रसिद्धीप्रमुख दिलीप बळी,सहसचिव संदिप नागरे,सहसंघटक शकिल पीर मोहम्मद,संदिप कदम, जिल्हा प्रतिनिधी अन्सार शहा,शेख बिसमिल्ला शेख नुरा,शेगांव तालुकाध्यक्ष सुनिल घावट,गजानन वाघमारे,संदेश कु-हाडे आदी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुका व जिल्हा पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

मुख्य वित्त लेखाधिकारी यांना निवेदन सादर करतांना प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे व जिल्हा पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.