Take a fresh look at your lifestyle.

INS Vikrant: पंतप्रधानांच्या उपस्थितीत युद्धनौका विक्रांतचे अनावरण

पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत

0

आज देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘INS विक्रांत’ भारतीय नौदलाला सुपूर्द करणार आहेत. भारताच्या सागरी इतिहासातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते केरळमधील कोची येथे उद्घाटन पार पडल्यानंतर भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रांत सामील होईल.

पहिली स्वदेशी युद्धनौका

पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. भारतीय नौदलाच्या स्वतःच्या संस्थेच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने युद्धनौका डिझाइन केली आहे. तर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कंपनीनं ही युद्धनौका तयार केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.