Take a fresh look at your lifestyle.

Tiger 3 | प्रेक्षकांची आतुरता अखेर संपली…सलमान-कतरिनाचा टायगर 3 या दिवशी येतोयं प्रेक्षकांच्या भेटीला…

चित्रपटाच्या टीझर व्हिडीओसोबत रिलीज डेटही समोर आली आहे. पुढच्या वर्षी 21 एप्रिल रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना आणि सलमान पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.सलमानच्या एक था टायगर या चित्रपटाचा पहिला भाग 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता.

0

मुंबई : अभिनेता सलमान खानने (Salman Khan) आज 15 ऑगस्ट रोजी चाहत्यांना अत्यंत मोठे गिफ्ट दिले. सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर 3’ चा टीझर व्हिडिओ समोर आला आहे. सलमान आणि कतरिनाचे चाहते या चित्रपटाची (Movie) आतुरतेने वाट पाहत आहेत. 15 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक था टायगर या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर हा तिसरा सिक्वेल 10 वर्षांनंतर प्रदर्शित होणार आहे. याबाबतची पोस्ट सोशल मिडियावर स्वत: सलमान खानने शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाचा धक्काच दिलायं. शिवाय सलमानने चित्रपटाच्या रिलीजची डेटही (Release date) जाहिर केलीयं.

सलमान खानने शेअर केलेली पोस्ट पाहा

चित्रपटाच्या टीझर व्हिडीओसोबत रिलीज डेटही समोर

चित्रपटाच्या टीझर व्हिडीओसोबत रिलीज डेटही समोर आली आहे. पुढच्या वर्षी 21 एप्रिल रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना आणि सलमान पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. सलमानच्या एक था टायगर या चित्रपटाचा पहिला भाग 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. पाच वर्षांनंतर ‘टायगर जिंदा है’ 2017 मध्ये रिलीज झाला, जो त्याचा दुसरा सिक्वेल होता. आता तब्बल 10 आणि पाच वर्षांच्या कालावधीनंतर तिसऱ्या सिक्वेलने रिलीज होणार असल्याने सलमानने जाहिर केले.

यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत यूट्यूब हँडलवरही खास झलक शेअर

यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत यूट्यूब हँडलवरही खास झलक शेअर केली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “10 वर्षांपूर्वी आपल्या हृदयात प्रवेश केला होता. आणि आता तो पुन्हा परत येण्यासाठी सज्ज झाला आहे, 2023 च्या ईदला टायगर 3 मध्ये तुमच्या भेटीला येतोयं. एक था टायगरची 10 वर्षे साजरी करत आहे. टायगर 3 साजरा येणार आहे. YRF 50 सह 21 एप्रिल 2023 रोजी तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर. हिंदी, तमिळ आणि तेलगू (sic) मध्ये रिलीज होत आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.